चार रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ७१ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यात ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या ३८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १३४४० वर जाऊन पोहचली आहे. तर आणखी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंत १३४४० कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत ९३३८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ४६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ३६४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागात ४१ रुग्ण
ग्रामीण भागात ४१ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यात पाचोड,पैठण-२, नूतन कॉलनी, गंगापूर -१, औरंगाबाद -९, फुलंब्री -१, सिल्लोड -२, वैजापूर -१५, पैठण -७, सोयगाव -४ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
शहरात ३० रुग्ण
शहरात ३० रुग्ण आढळून आले आहे. त्यात बैजिलालनगर -१, सिडको परिसर -१, मुकुंदवाडी-१, जवाहर कॉलनी -१, पंचशीलनगर -२, रोशन सोसायटी गारखेडा-१, उल्कानगरी -४, एन सहा सिडको -६, संघर्ष नगर, मुकुंदवाडी-३, सिद्धार्थनगर -५, गवळीपुरा -१, रामनगर -१, एनसात, अयोध्यानगर-१, गारखेडा परिसर-२ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.
चार कोरोनबाधितांचा मृत्यू
आणखी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यात खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समतानगर, शिक्षक कॉलनीतील ५८ वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील ५९ वर्षीय पुरूष, रोशनगेट येथील ७० वर्षीय पुरूष आणि फाजलपु-यातील ४६ वर्षीय पुरूष रुग्णाचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.










